मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (07:18 IST)

"दीपिका मोठ्या मोठ्या भूमिकादेखील सहज सुंदरतेने साकारते", माधुरी दीक्षितने केले दीपिका पादुकोणचे कौतुक!

Madhuri Dixit
माधुरी दीक्षित भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्रींपैकी एक आहे जिने अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारून दर्शकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीला एका चाहत्याने विचारले होते की कोणत्या अभिनेत्रीला तू या पिढीची रॉकिंग स्टार मानतेस? यावर माधुरीने जे नाव घेतले ती अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण.
 
माधुरीने म्हटले की, "तिला दीपिका आवडते. कारण ती त्या अभिनेत्रींपैकी आहे जी व्यक्तिरेखेला आपल्या आत उतरवते." माधुरी पुढे म्हणाली की, "दीपिका देखील मोठ्या मोठ्या भूमिकांना सहज सुंदरतेने निभावते." 
 
साक्षात माधुरीच्या तोंडून हे ऐकल्यानंतर, दीपिकाच्या चाहत्यांच्या उत्साहाला पारावार उरला नसेल. चाहत्यांसाठी ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला तिच्या प्रतिभा आणि कठोर मेहनतीसाठी एका उल्लेखनीय कलाकाराकडून कौतुकाची थाप मिळते.
 
दीपिकाच्या अभिनयातली सहज सुंदरता आणि व्यक्तिरेखेचे सर्वोत्तम सादरीकरण करण्याची तिची क्षमता या गुणांनी चाहत्यांसोबतच चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेत्यांना देखील प्रभावित केले आहे. चित्रपट ओम शांति ओम सोबतच्या आपल्या प्रभावी सुरूवातीनंतर, जगाला तिची सुंदरता, प्रतिभा आणि नृत्याने वेड लावले. पीकू, राम लीला, कॉकटेल, ये जवानी है दीवानी सारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाने हे सिद्ध केले आहे की तिच्या बहुमुखी प्रतिभेला तोड नाही.